Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली...

read more
जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्याची मागणी – मनमाड ला दोन शिवभक्त बसले आमरण उपोषणाला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित करण्याची मागणी – मनमाड ला दोन शिवभक्त बसले आमरण उपोषणाला

मनमाड शहरातील श्री छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत सतत होणारी टाळाटाळ आणि...

read more
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मोत्सव लोकनेत्याचा उपक्रम संपन्न !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मोत्सव लोकनेत्याचा उपक्रम संपन्न !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर...

read more
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्रिपदावरून हटवा – मनमाड शिवसेनेचे आंदोलन

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्रिपदावरून हटवा – मनमाड शिवसेनेचे आंदोलन

मनमाड - भाजप नेते तथा उच्चशिक्षित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]