loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
.