loader image
[ays_poll id=7]

महावितरण विरोधात मनमाड शिवसेना एक्शन मोडवर – निवेदन देत केल्या मागण्या

Feb 28, 2026

मनमाड – शहरात वीज मंडळाच्या वतीने आरेरावी पद्धतीने सुरू असलेल्या थकबाकी वसुली मोहिमेबाबत शिवसेना मनमाड शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मयूर बोरसे यांनी कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मनमाड विभाग यांना निवेदन देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील अनेक वीज ग्राहकांकडून तक्रारी शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे येत आहेत. अनेक ग्राहक थकीत रकमेपैकी 50% ते 70% रक्कम तातडीने भरण्याची तयारी दाखवत असतानाही वीज मंडळाचे अधिकारी पूर्ण रक्कम जागेवरच भरण्याचा आग्रह धरीत वीजपुरवठा खंडित करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनमाड हे कामगार वस्तीचे शहर असून अनेक ग्राहकांनी बिलांबाबत दिलेल्या लेखी तक्रारी निकाली न निघताच त्यांना ‘संपूर्ण बिल भरा अन्यथा वीजपुरवठा तोडू’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

* मागण्या :

1. ज्यांच्या तक्रारी प्रलंबित आहेत, त्यांचे शंका निरसन होईपर्यंत वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात यावेत.

2. जास्त थकबाकी असल्यास रक्कम दोन हप्त्यांत भरण्याची परवानगी द्यावी.

3. चुकीच्या बिलांवरील तक्रारी तत्काळ मार्गी लावाव्यात.

4. कारवाईपूर्वी ग्राहकांना पूर्वसूचना अथवा नोटीस देण्यात यावी.

5. वसुली करताना मानवी दृष्टिकोन ठेवून अरेरावीची भाषा टाळावी.

या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेना मनमाड शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी दिला आहे.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक नाना शिंदे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, दिनेश घुगे, प्रमोद अहिरे, सागर आव्हाड, गौरव थोरात, सिद्धार्थ छाजेड, देवेंद्र घाठे, सागर छाजेड, करण बहोत, निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.