loader image
[ays_poll id=7]

भाषेचा गौरव म्हणजे संस्कृतीचा गौरव : प्राचार्य डॉ. अरुण पाटील

Mar 4, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा संपन्न

मनमाड – येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील बोलत होते. त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, त्यातील गोडवा, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, प्राचीन मराठी, शिवकालीन मराठी ते आधुनिक मारठी याचा सांगोपांग आढावा घेतला. बोली भाषेतील अभिव्यक्तीमुळे मराठी भाषा समृद्ध आहे असेही ते म्हणाले. भाषेचा गौरव म्हणजे संस्कृतीचा गौरव, ती भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचा गौरव असल्याचे त्यानी सांगितले. सुरुवातीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. धनराज धनगर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ. राहुल लोखंडे यांनी मानले.

यावेळी काव्यवाचनात एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नवोदित कवींच्या कवितांमध्ये आई, वडील, मन, प्रेम, निसर्ग असे विषय होते. वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक सौ. वर्षा जयंत कुलकर्णी, द्वितीय क्रमांक कु. रचना विजय चंदनशिव, तृतीय क्रमांक रुपेश बाळू सरोदे यांनी पारितोषिके पटकावली. तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून स्वाती मार्कंड (प्रथम क्रमांक), विशाखा शिंदे (द्वितीय क्रमांक), गौरी मार्कंड (तृतीय क्रमांक) यांनी यश संपादन केले.

अजून बातम्या वाचा..

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पटना बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन...

read more
कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
एच.ए.के.हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज मध्ये फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता १२ वी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज मध्ये फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता १२ वी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

मनमाड:- इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२३ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल अँड...

read more
महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी त्र्यंंबकेश्वर मंदिरात सुमारे तीन लाख शिवभक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप...

read more
बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती तून ट्रॅक्टर चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती तून ट्रॅक्टर चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून कांदा विक्रीस आलेला ट्रॅक्टर...

read more
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्यार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे निवेदन

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्यार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे निवेदन

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे. पत्रकार संरक्षण...

read more
नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून...

read more
.