loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

Mar 19, 2026

मनमाड – महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16 खेळाडुंची निवड चाचणी फेब्रुवारी महिन्यात पुर्ण झाली. या निवडचाचणी मध्ये मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर, गौरव निते, मयंक भालेराव, शान मोकळ, कलश मुळमुळे, निखिल कोळपे व शिवम माने यांची संभावित खेळाडुंच्या यादीमध्ये निवड झाली. या निवडचाचणीसाठी विविध जिल्ह्य़ातील खेळाडुंनी हजेरी लावली.

निवड झालेल्या या खेळाडुंना आता 3 दिवसीय निवड सामण्यांमध्ये खेळण्याची संधी मिळेल ज्यातून नंदुरबार जिल्हा संघ निवडला जाईल जो महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत विविध जिल्ह्यात होणार्या आमंत्रिताच्या स्पर्धेत सहभाग करेल. मनमाडच्या या नवोदित खेळाडुंकडुन चांगले प्रदर्शन होऊन ते जिल्हासंघात स्थान प्राप्त करुन पुढे महाराष्ट्र संघात स्थान मिळवतील अशा शुभेच्छा या खेळाडुंना मनमाडमधील विविध स्तरातून देण्यात येत आहेत.

या निवडीसाठी नंदुरबार जिल्ह्य़ाचे सेक्रेटरी युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा प्रबंधक जथेदार बाबा रणजित सिंहजी तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक सुखदेव सिंग सर यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना प्राप्त झाले.
नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे , योगेश पाटील , मयुर बोरसे , ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , श्रेणिक बरडिया , तय्यब शेख , नितीन अहिरराव तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांच्यातर्फे या खेळाडुंना शुभेच्छा देण्यात आल्या.

या खेळाडुंना भुमी क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक सिध्दार्थ (भोला) रोकडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.