loader image
[ays_poll id=7]

स्पर्धा परीक्षासाठीच्या 30 वर्षांच्या कमाल वयोमर्यादेची अट रद्द

Sep 1, 2026

बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत आणि आर्टी आदी संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी लागू असलेली ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा शासनाने शिथिल केली आहे. एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

वंचित, मागास, आदिवासी, ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने या संस्थांमार्फत पूर्व प्रशिक्षण दिले जाते. मात्र, या प्रशिक्षणासाठी सरसकट ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता.

एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षांसाठी अनेक प्रवर्गांमध्ये ३० वर्षांनंतरही परीक्षा देण्याची संधी असताना पूर्व प्रशिक्षणासाठी मात्र ३० वर्षांची अट का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला होता. ही विसंगती दूर करून प्रशिक्षणाची वयोमर्यादा संबंधित स्पर्धा परीक्षांच्या पात्रता निकषांशी सुसंगत करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने शासनाकडे केली होती. त्‍याची दखल घेत शासनाने ३० वर्षाची अट रद्द केली.

अजून बातम्या वाचा..

13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
.