loader image
[ays_poll id=7]

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Sep 2, 2026

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील भेसळ कमी झाली आहे. खाद्यपदार्थातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे जेवण आढळताच तुकाराम मुंढे थेट कारवाई करताना दिसत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सुट्ट्या तेलाची विक्री बंद केली. खाद्यतेलाची विक्री करताना तेलकंपन्यांना नियमांचे पालन करावे लागेल, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, व्यापारांना मोठा फटका बसत आहे, असा दावा केला जात होता. असे असतानाच आता राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय फिरवला आहे. सुट्टे खाद्यतेल विकण्यासाठी सरकारने एका वर्षाची मुदत दिली आहे.
सुट्टे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी फडणवीस यांना सांगितल्या. याच चर्चेनंतर व्यापाऱ्यांना सुटे तेल विकण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मात्र यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वांना कायदा पाळावाच लागेल. या 1 वर्षात प्रत्येकाने आपल्या व्यवसायात अनुकूल बदल करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

दुर्र्स अल्बेनिया येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (दि- 23 मार्च ते 2 एप्रिल 2023)...

read more
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच...

read more
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक...

read more
महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

मनमाड - ''६० वर्षांचा भीषण पाणीटंचाईच्या बेडीत अडकलेल्या मनमाडच्या महिलांना सत्यशोधक मंच तथा मनमाड...

read more
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता सरकारी कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विधिमंडळात या...

read more
राज्य शासन कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य शासन कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात सध्या कांद्याच्या भावात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात...

read more
.