loader image
[ays_poll id=7]

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Sep 2, 2026


सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील भेसळ कमी झाली आहे. खाद्यपदार्थातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे जेवण आढळताच तुकाराम मुंढे थेट कारवाई करताना दिसत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सुट्ट्या तेलाची विक्री बंद केली. खाद्यतेलाची विक्री करताना तेलकंपन्यांना नियमांचे पालन करावे लागेल, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, व्यापारांना मोठा फटका बसत आहे, असा दावा केला जात होता. असे असतानाच आता राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय फिरवला आहे. सुट्टे खाद्यतेल विकण्यासाठी सरकारने एका वर्षाची मुदत दिली आहे.
सुट्टे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी फडणवीस यांना सांगितल्या. याच चर्चेनंतर व्यापाऱ्यांना सुटे तेल विकण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मात्र यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वांना कायदा पाळावाच लागेल. या 1 वर्षात प्रत्येकाने आपल्या व्यवसायात अनुकूल बदल करावा, असे आवाहनही त्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आता दुप्पट निवृत्ती वेतन – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आता दुप्पट निवृत्ती वेतन – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय राज्यातील स्वातंत्र्य...

read more
बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

बाळासाहेबाची शिवसेना पक्षातर्फे नांदगाव शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ. सुहास कांदे यांच्या मार्गदर्शना खाली नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे गुरुवारी एकात्मता चौकात अभिवादनाचा कार्यक्रम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे गुरुवारी एकात्मता चौकात अभिवादनाचा कार्यक्रम

शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नांदगाव विधानसभा/तालुका शिवसेना मनमाड शहर अखंड हिंदुस्थानाचे...

read more
उत्तर महाराष्ट्रातील पहिले “रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर” मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरु

उत्तर महाराष्ट्रातील पहिले “रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर” मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरु

प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे उदघाटन नाशिकचे लोकप्रिय...

read more
.