loader image
[ays_poll id=7]

म्हाडा प्रकरणात महसूल नंतर आता भूमी अभिलेखचे नऊ कर्मचारी निलंबित!

Sep 4, 2026


संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाशिक येथील म्हाडा घोटाळ्याची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या चौकशीत दोन दिवस आधी महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाई नंतर आता भूमिअभिलेख विभागात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख विभागातील तब्बल नऊ कर्मचाऱ्यांवर गुरुवारी (ता. ३) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात दोन शिरस्तेदार, तीन भूकरमापक, एक पर्यवेक्षक व तिघे इतर कर्मचारी आहेत. म्हाडाप्रकरणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने भूमिअभिलेखसह इतर संबंधित विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना त्यांचे शासकीय दफ्तर तत्काळ जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निलंबन कालावधीत सरकारी कामात भाग घेण्यास बंदी असणार आहे. यामधील काही वरिष्ठ अधिकऱ्यांना परजिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असेल. तर काही जणांना जिल्ह्यातंर्गत अन्य तालुक्यांमध्ये जाऊन हजेरी द्यावी लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

१९ व २० नोव्हेंबरला २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक – ह्या गाड्या होणार रद्द

१९ व २० नोव्हेंबरला २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक – ह्या गाड्या होणार रद्द

मध्य रेल्वे मार्गावरील कर्नाक रोड येथील ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी रेल्वेकडून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक...

read more
स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम

नांदगाव : स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी खंडकरी शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते कॉ. माधवराव गायकवाड...

read more
.