loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा – आमदार कांदेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Sep 17, 2026

नांदगाव विधानसभा मतदार संघात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांना तात्काळ दुष्काळ जाहीर करत विविध उपयोजना करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगांव व मालेगांव तालुक्यांमध्ये चालू वर्षी २०२६ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदार संघातील जवळपास १००% गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जनतेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मतदार संघातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअरवेल, तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. महिलांना २ ते ३ किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. पाण्या अभावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असुन शेतकऱ्यांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तात्काळ चारा छावण्या व चारा डेपो सुरु करणे गरजेचे आहे. खरीप पिके पूर्णपणे वाया गेली असुन रब्बी हंगाम देखील धोक्यात आहे. विहिरींना पाणी नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. शेती पीक कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची लवकरात लवकर यादी जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करण्यास मदत होणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त गावांमध्ये मनरेगा (MGNREGA) ची कामे मोठ्या प्रमाणात सुरु करून रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन टैंकर मंजूर करून जुन्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

तरी, आपण स्वतः या विषयात लक्ष घालून नांदगाव विधानसभा मतदार संघाला तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून वरील सर्व उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी विनंती आ. कांदे यांनी पत्रातून केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.