loader image
[ays_poll id=7]

ज्ञानेश्वर युवक मित्र मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन

Sep 19, 2026

शहरातील कॅम्प परिसरातील अयोध्या नगर येथील ज्ञानेश्वर युवक मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाचे सदस्य स्व. संजय सोनवणे व स्व. कैलास खैरनार यांच्या स्मरणार्थ गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी सेवा ब्लड बँक, मालेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात एकूण 113 रक्तपिशव्यांचे संकलन झाले.

याच दिवशी मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजेनंतर उपस्थित भाविक, नागरिक व कार्यकर्त्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा सुंदर संगम साधत मंडळाने हा दिवस उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला.

रक्तदानातून जीवनदान आणि सेवेतून सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानेश्वर युवक मित्र मंडळाने आपल्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली. यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
.