loader image
[ays_poll id=7]

तलाठ्यांच्या निलंबनाला स्थगिती ! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय

Sep 23, 2026

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तलाठी कामबंद आंदोलनाला दिलासा मिळाला आहे. इगतपुरी तालुक्यातील तीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईला अखेर स्थगिती देण्यात आलीय. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी केलेल्या निलंबनाच्या आदेशाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थगिती देत संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती प्राप्त अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याने नाशिक जिल्हा तलाठी संघाने पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला तूर्तास दिलासा मिळाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांवरील निलंबन आणि वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईविरोधात तलाठी संघाने आंदोलन पुकारले होते. पवन दत्ता यांच्या बदलीसह संबंधित कारवाया मागे घेण्याची मागणी संघाने केली होती. प्रशासनाकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे आणि तहसीलदार आबासाहेब तांबे यांच्या समितीने आंदोलकांशी चर्चा केली.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
.