loader image
[ays_poll id=7]

क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपरिषदेला इशारा

Sep 23, 2026


मनमाड शहरात असलेला क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांचा अर्धाकृती पुतळा हटवून त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित आहे. सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनमाड शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगर पालिका प्रशासनास देण्यात आला आहे.
शहरातील महालक्ष्मी चौक येथील पुतळ्याच्या नियोजित जागेत बांधलेल्या चाबूतर्याला पुष्पहार अर्पण करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख माधव शेलार, जाफर मिर्झा, नगरसेवक दीपक दराडे, शिवसेना गटनेते अमोल नरवडे, संजय कटारे, नगरसेविका सौ सुजाता प्रवीण नाईक, उपतालुकाप्रमुख प्रवीण सूर्यवंशी, संजय सोळसे,माजी नगरसेवक योगेश बच्छाव, राजाभाऊ वाघ, संतोष साळुंके, मनोज अंकुश, सिद्धांत पाटील, विजय परदेशी, बाळासाहेब सुपेकर, विजय शिनगारे, चेतन चावरिया, राहुल वाघमारे, काळू माळी, कचरू आव्हाड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
.