loader image
[ays_poll id=7]

संस्कारखेळवाडीत विविध पेहराव स्पर्धा उत्साहात संपन्न

Sep 24, 2026


बालकांच्या सादरीकरणातून सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्यविषयक संदेश
संस्कारखेळवाडीत बालकांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देण्यासाठी विविध पेहराव स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बालकांनी इंद्रधनुष्य, शेतकरी, टीव्ही, मोबाईल, कोलगेट-ब्रश, नारळ, वाहतूक सिग्नल, उमलणारी कळी, पाणी, आंबा, सफरचंद, झाड, वर्तमानपत्र, शेफ अशा विविध विषयांवर आधारित आकर्षक पेहराव साकारले.
बालकांनी केवळ सुंदर पेहराव करून सहभाग नोंदविला नाही, तर आपल्या भूमिकेच्या माध्यमातून उपस्थितांना आरोग्य, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, वाहतूक नियम, शेतकऱ्यांचे महत्त्व तसेच मोबाईलच्या योग्य वापराचे सुंदर संदेश दिले. प्रत्येक बालकाचा आत्मविश्वासपूर्ण व उत्स्फूर्त सहभाग विशेष कौतुकास्पद ठरला.
या स्पर्धेसाठी पालकांनी घेतलेली मेहनत, कल्पकता आणि कलात्मक दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला. उपलब्ध साहित्याचा कल्पक वापर करून तयार केलेले पेहराव पाहून पालकांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. आपल्या पाल्याला विषय समजावून सांगून त्याच्याकडून प्रभावीपणे संदेश मांडून घेण्यात पालकांचा मोलाचा सहभाग दिसून आला.
बालकांनी स्वतःच्या शब्दांत दिलेले छोटे-छोटे संदेश उपस्थितांची मने जिंकून गेले. “खेळातून शिक्षण आणि कृतीतून संस्कार” या संस्कारखेळवाडीच्या संकल्पनेचा सुंदर प्रत्यय या उपक्रमातून आला.
या उपक्रमाचे नियोजन मुख्यध्यापिका कोमल मिश्रा, रुपाली बागुल, रूपाली गागरे आणि उमेश कुलकर्णी यांनी केले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली.


अजून बातम्या वाचा..

सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

      सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण अमेरिकेतील...

read more
मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना  पालखी मिरवणुक पारंपरिक   थाटात संपन्न

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

                         मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
.