Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

Sep 24, 2026

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या उद्देशाने संस्कारखेळवाडीत आज विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील बालकांचे आजोबा मा. बाळासाहेब हादगे यांनी बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून बालकांना पारंपरिक कौशल्याची अनोखी ओळख करून दिली.

यावेळी मा. हादगे यांनी बांबूचे विविध प्रकार, त्यांचे उपयोग तसेच योग्य कामासाठी कोणत्या प्रकारचा बांबू वापरला जातो, याबाबत माहिती दिली. बांबूपासून तब्बल ३६०० प्रकारच्या उपयोगी वस्तू तयार करता येतात, ही माहिती बालकांसाठी विशेष आकर्षण ठरली.

टोपली, पंखा, चटई आदी वस्तू तयार करून दाखवताना त्यांनी त्यासाठी लागणारे साहित्य, साधने व हत्यारे यांचीही बालकांना ओळख करून दिली. बांबूच्या वस्तू तयार करताना होणारी मेहनत, हाताला लागणाऱ्या जखमा, कष्ट आणि वेळ याविषयी त्यांनी अत्यंत सहज व प्रभावी पद्धतीने सांगितले.

या प्रात्यक्षिकातून “वस्तूच्या किमतीपेक्षा ती तयार करण्यामागचा कष्टाचा घाम महत्त्वाचा असतो” याची जाणीव बालकांना झाली. त्यामुळे हाताने तयार केलेली टोपली किंवा अन्य वस्तू खरेदी करताना अनावश्यक भाव न करता कारागिराच्या मेहनतीचा सन्मान करावा, हा सुंदर संस्कार बालमनावर रुजला.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. बाळासाहेब हादगे यांचा सन्मानचिन्ह व मानाचे वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल संस्कारखेळवाडी परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्कारखेळवाडी टीमने केले. पारंपरिक ज्ञान, कौशल्य, श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम बालकांसाठी अविस्मरणीय ठरला.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]