Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

Oct 2, 2026

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. तसेच परवानगी असलेल्या फटाक्यांच्या प्रकारांसाठी विशिष्ट वेळा निश्चित करण्याचे संकेत दिले आहे.
न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ते फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याच्या बाजूने नाहीत, कारण त्यामुळे दिवाळी साजरी करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. किंबहुना, न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की ते दिवसभर फटाके फोडण्याची परवानगी देणार नाहीत.

न्यायालयाने यासंदर्भातसांगितलंकी, “आम्ही हे अगदी स्पष्ट करतो की, आम्ही पूर्ण बंदीच्या तुमच्या मताशी सहमत नाही आणि आम्ही 24 तास फटाके फोडण्याची परवानगीही देणार नाही. पूर्ण बंदीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. आणि दिवसभर फटाके फोडण्याची परवानगी दिल्यास वृद्ध, आजारी आणि लहान मुलांसह इतर नागरिकांवर मोठा परिणाम होईल. आपल्याला असा उपाय शोधण्याची गरज आहे ज्याद्वारे आपण फटाके फोडण्यासाठी विशिष्ट वेळ निश्चित करू शकू,” असे न्यायालयाने म्हटले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

तरुणांमधील व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखू एवढ्यापुरतीच चर्चा केली जाते. मात्र...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]