Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

Oct 5, 2026

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने आतापासून पावले उचलण्यास सुरुवात केली असून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवून त्याद्वारे चाऱ्याची उपलब्धता करण्याची योजना राबविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ट्रिगर-1 लागू केलेला आहे. खरिपाचा हंगाम पूर्णतः वाया गेला असून पाऊस नसल्याने रब्बीच्या हंगामाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. आज जरी जनावरांना चारा उपलब्ध असला तरी तो डिसेंबर-जानेवारी पर्यंतच पुरणार आहे, मात्र त्यानंतर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न आ वाचून उभा राहणार आहे, भविष्यात ही चारा टंचाई जाणवू नये यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरुवात केली आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही सिंचनाची सोय उपलब्ध आहे, त्यांना शासनामार्फत आफ्रिकन टॉल या जातीचे मका बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी पाण्यामध्ये आणि 35 ते 40 दिवसांमध्ये हे पीक कापणीसाठी तयार होते. पीक पूर्णपणे तयार झाल्यावर या तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर हा चारा तहसीलच्या माध्यमातून अथवा चारा छावण्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दुष्काळाची भीषणता पाहता डिसेंबर जानेवारीनंतर कधीही चारा छावण्या सुरु कराव्या लागणार आहेत, अशा वेळी हा चारा शेतकऱ्यांना कडून विकत घेऊन या चारा छावण्या मार्फत गरजू शेतकऱ्यांना पुरवला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना रोख रक्कम असा दुहेरी फायदा या योजनेद्वारे होणार आहे. पाऊस पडलेला नसल्याने आता दुसरे पीक घेणे शक्य होणार नाही अशा पार्श्वभूमीवर ज्यांच्याकडे किमान काही सिंचनाची सोय उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेद्वारे लाभ मिळू शकणार आहे.

या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असून याबाबतचे अर्ज संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत. सातबारा उतारा त्यावर विहिरीची नोंद आवश्यक आणि आधार कार्ड ही कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्ज भरून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल, अशी माहिती नांदगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ.एन.टी.ताठे यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]