Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगावचे क्रीडा स्पर्धेत तिहेरी यश.

Oct 5, 2026

महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संघनालय पुणे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो या सहभागा अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे विभागीय वुशु स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत कु. साक्षी प्रमोद सोनवणे वर्ग १२वी( कला) आणि जन्मजय विनोद कांमळे वर्ग १२ विज्ञान या दोन खेळाडूची नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच दिनांक ४ /१०/२६ रोजी स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे शालेय विभागीय- स्तर बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत कु.सोनाली दीपक पठाडे ही प्रथम क्रमांकाने विजयी होऊन तिची राज्यस्तरावर निवड झाली.

तसेच कु.प्राची काळे,कु. कावेरी काळे ,कु.साक्षी सोनवणे, कु.वैष्णवी कुलथे या द्वितीय क्रमांकाने विजयी झाली. तसेच दिनांक ५/१०/२६ रोजी लोणारे क्रीडा संकुल येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतही आपल्या खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करत कु.साक्षी प्रमोद सोनवणे द्वितीय क्रमांकाने विजयी झाली.कु. कावेरी काळे ही तृतीय क्रमांकाने विजयी झाली.

या सर्व विजयी खेळाडूचे मविप्र संचालक इंजि.अमित बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन.यु. पाटील, डॉ. प्रवीण निकम (कनिष्ठ महाविद्यालय स्कूल कमिटी सदस्य), मा. दीपक मस्के (ज्येष्ठ मविप्र सभासद),वि.वाय. काकळीज सर, दिनकर पाटील साहेब, राजेश पाटील साहेब तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे उपप्राचार्य डी.एम. राठोड, कला वाणिज्य विभाग प्रमुख बोरसे जी.व्ही, विज्ञान विभाग प्रमुख जपे पी.एन. क्रीडा संचालक लोकेश गळदगे, क्रीडा सहाय्यक दिलीप अहिरराव तसेच महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सर्व यशस्वी खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री डी. एम. राठोड सर, क्रीडा संचालक लोकेश गळदगे सर, क्रीडा सहाय्यक दिलीप अहिरराव यांचे योग्य व तंत्र कौशल्याचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]