Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कसाऱ्यात 17 ला रेल्वेचा मेगा ब्लॉक

Oct 7, 2026

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे लाईन प्रकल्प आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामामुळे कसारा येथे १७ ऑक्टोबर रोजी पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगच्या या कामांचा थेट आणि मोठा फटका नाशिककर प्रवाशांना बसणार आहे. मुंबई आणि शिर्डी दरम्यान धावणारी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस या काळात रद्द राहणार असून या गाडीसह ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
१६ आणि १७ ऑक्टोबर रोजी उत्तर भारत आणि पूर्व भारतातून सुटणाऱ्या अनेक गाड्या नाशिक-मनमाडमार्गे येणार नाहीत. त्या जळगाव-नेवासा-वसई रोड किंवा मनमाड-पुणे-कल्याण अशा पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्या विलंबाने धावतील, ज्यामुळे नाशिक रोड स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागू शकते.
रद्द झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांचे होणार हाल
तांत्रिक कामामुळे मध्य रेल्वेने १७ ऑक्टोबर रोजी नाशिक व उत्तर महाराष्ट्राशी जोडलेल्या अतिमहत्त्वाच्या गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. यात मुंबई-शिर्डी वंदे भारत, मनमाड-मुंबई एक्स्प्रेस आणि मुंबई-धुळे एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय मुंबई-अमरावती, मुंबई-नागपूर आणि मुंबई-बल्हारशाह गाड्याही या काळात बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होणार आहे.
नाशिकरोड स्टेशनवरच ‘वंदे भारत’ थांबवणार
मेगाब्लॉकमुळे नांदेड-मुंबई वंदे भारत गाडी १७ ऑक्टोबरला थेट मुंबईला न जाता नाशिक रोड स्थानकावरच थांबविण्यात येईल. परतीची मुंबई-नांदेड वंदे भारत मुंबईऐवजी नाशिक रोडवरूनच सुटेल.
तसेच मनमाड मार्गे धावणाऱ्या जनशताब्दी आणि नांदेड एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावतील. त्यामुळे नाशिक रोड स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40...

read more
मनमाडचे प्रसिद्ध उद्योजक अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर

मनमाडचे प्रसिद्ध उद्योजक अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर

श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष श्रीमान मा. अजितभाऊ सुराणा...

read more
करंजवन पाणीपुरवठा योजनेचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

करंजवन पाणीपुरवठा योजनेचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या चार दशकांपासून रखडलेला मनमाडचा पाणीप्रश्न अखेर मिटणार असून मनमाडवरचा पाणीटंचाईचा कलंक पुसला...

read more
कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
चाचा नेहरू बालमहोत्सवामुळे मिळाला बालकांच्या विविध कलागुणांना वाव! -चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक

चाचा नेहरू बालमहोत्सवामुळे मिळाला बालकांच्या विविध कलागुणांना वाव! -चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक

नाशिक- महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र शासन व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक...

read more
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]