Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता?

Oct 7, 2026

राज्यात प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्य शासनाने जवळपास संपूर्ण राज्यातच दुष्काळ जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील अर्थचक्र पूर्णपणे विस्कटलेली आहे व आज शेतकरी बांधवांसमोर पिके वाचवण्यासोबतच जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची सोय करणे हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायत निवडणुका या दिवाळीनंतर होतील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु राज्यातील एकूणच ग्रामीण भागातील बिकट परिस्थिती बघता या निवडणुका अजून लांबणीवर पडतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने ही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत भविष्यातील उपाय योजना करण्याकडे आपला मोर्चा वळविला असून शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थिती जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीने व भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका अजून लांबणीवर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या सहा विकास कामांच्या षटकार व्हिडिओचे सोशल मीडियावर जनतेतून स्वागत

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या सहा विकास कामांच्या षटकार व्हिडिओचे सोशल मीडियावर जनतेतून स्वागत

नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघात आतापर्यंतच्या कार्यकाळात...

read more
मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने, तसेच...

read more
राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२३ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी सेविका कल्पना ताई जाधव.पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.

दिनांक २० मार्च ते ०३ एप्रिल २०२३सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल...

read more
नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड...

read more
अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]