Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

Oct 15, 2026

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य आदरणीय डॉ.बी.एस. देसले यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी विभागाचे प्राध्यापक विठ्ठल सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व त्यातून होणारा सकारात्मक बदल तसेच विद्यार्थ्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे आणि अधिकाधिक वाचन करून आपण स्वतःला समृद्ध करून घेतले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालयात विविध विषयावरील ४०० पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक एल. के. निकम तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.डॉ. राहुल लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहन मोहिते, अरुण बच्छाव व रोहन बागुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]