Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकासह मनमाडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी

Oct 16, 2026

तीन सुवर्ण दोन रौप्य व एका कास्यपदकासह मनमाडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी.
दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय 17 19 वर्षातील मुले व मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागातील 275 खेळाडूंनी सहभागी होत स्पर्धेत चूरस निर्माण केली.
मनमाडच्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
आनंदी विनोद सांगळे माध्यमिक विद्यालय वाघदर्डी
वैष्णवी आतिश शुक्ला मध्य रेल्वे मा विद्यालय
ध्रुव केशव पवार माध्यमिक विद्यालय वाघदर्डी
यांनी आपापल्या वजनी गटात दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले व त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे.खुशबू गजेंद्र चुदरे (छत्रे विद्यालय) आणि अवधूत एकनाथ आव्हाड (माध्यमिक विद्यालय, जातेगाव) या खेळाडूंनी रौप्यपदके पटकावली,तर श्रेया वाल्मीक सोनार (छत्रे विद्यालय) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

प्रांजल शरद आंधळे अक्षरा सुहास व्यवहारे मुग्धा संतोष माळी शामल प्रदीप तायडे शिवम रवींद्र आहेर यश सुनील सहस्त्रबुद्धे यश दिलीप अहिरे आयुष आनंद गांगुर्डे संचिता सचिन गांगुर्डे श्रावणी दीपक मंडलिक मनस्वी राहुल गवळी या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत चांगली कामगिरी केली.

यशस्वी खेळाडूंना जय भवानी व्यायामशाळेत छत्रे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी नाशिक अंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आकाश शिंदे तसेच जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष पोपटशेठ बेदमुथा, डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापक प्रसाद पंचवाघ, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे तसेच महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]