Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पालिका सफाई कामगारांचे घराचे स्वप्न साकार, 34 कामगारांना मिळाले हक्काचे घर

Oct 16, 2026

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड नगर पालिकेच्या सफाई कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून मनमाड नगरपालिकेच्या 34 सफाई कर्मचाऱ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. स्वच्छताकर्मी संवाद अभियानाअंतर्गत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना मोफत घरकुलाच्या कागदपत्रांचे वितरण येथील सगळे लॉन्स येथे करण्यात आले.

यावेळी मनमाड आणि नांदगाव नगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांना गणवेशासह विविध उपयोगी साहित्याचे वाटपही करण्यात आले मनमाड येथे आयोजित स्वच्छताकर्मी संवाद अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात मनमाड नगरपालिकेचे 34 सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरकुलांच्या कागदपत्राचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते करण्यात आले तसेच सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश आणि विविध आवश्यक साहित्याची वाटप करण्यात आले.

नांदगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाही विविध वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, नांदगावचे मुख्याधिकारी शामकांत जाधव आणि नगरसेवकांच्या हस्ते जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक राजेंद्र पगारे, मयूर बोरसे, मुकुंद एळींजे, यांच्यासह राकेश ललवाणी, मुश्ताक कुरेशी, कैलास गवळी, अमीन पटेल, दिनेश घुगे, प्रवीण पाटील, विशाल अहिरे, उपनगराध्यक्ष कमल आंधळे, नगरसेविका पुजा साबळे, रेशमा पगारे, संगीता बागुल, शारदा अहिरे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]