मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची सविस्तर बातमी अशी की शहरातील विवेकानंद नगर क्रमांक २ परिसरात राहणारे सागर शिंदे यांच्या पत्नी सकाळी आंगण झाडत असताना दोन अनोळखी तरुण दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पसार झाले. १५ दिवसांपूर्वी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुक्तांगण परिसरातून सुद्धा दोन दुचाकीस्वारांनी पाळत ठेवत सोन्याची पोत ओरबाडून पसार झाले होते. शहरातील नागरी वस्त्यांची होत असलेली वाढ आणि लोकसंख्येच्या तुलनेत असलेले पोलिसांची असलेली कमी कुमक चा प्रश्न या निमित्ताने पुन्हा अधोरेखीत झाला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...











