Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे ‘हितगुज संवाद दौरा व मेळावा’ संपन्न

Oct 26, 2026

नांदगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क नेते रवींद्रजी मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘हितगुज संवाद दौरा व मेळावा’ आयोजित करण्यात आला.

माणिक संकुल येथील शिवसेना संपर्क कार्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, आगामी रणनीतीवर चर्चा करणे आणि स्थानिक शिवसैनिकांशी थेट संवाद साधणे या उद्देशाने हा संवाद दौरा पार पडला.

मेळाव्याला दिंडोरी लोकसभेचे सह-संपर्क प्रमुख राजूभाऊ पाटील, लोकसभा प्रमुख कारभारी आहेर आणि नाशिक ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक यांची प्रमुख मार्गदर्शन लाभले, उपस्थितांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला व आगामी काळातील पक्षाच्या ध्येय-धोरणांवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नांदगाव तालुका हा दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहे पक्षाच्या वतीने त्यांना जी मदत होईल ते करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले.

हितगुज कार्यक्रमात शिवसेना जिल्हा समन्वयक सुनील पाटील,शिवसेना नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, मनमाड शहरप्रमुख माधव शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर, विधानसभा संघटक रवींद्र अमराळे, तालुका सचिव शैलेश सोनवणे,जाफर मिर्झा, नगरसेवक दिपक दराडे, अमोल नरवडे, माजी नगरसेवक मायकल फर्नांडीस, अशोक पदमर, प्रवीण सूर्यवंशी, निवृत्ती गुंजाळ, बबन आव्हाड, प्रकाश चावरिया, दिलीप नंद, गौरख जाधव, मच्छिन्द्र वाकचौरे, विजय शिनगारे, दत्तू इप्पर, साहेबराव गायकवाड, भाऊसाहेब सदगीर, विष्णू सोनवणे, गौतम जैन, प्रमोद मोरे, बबन उगले, मनोज अंकुश, आत्माराम सदगीर, मुख्तार पटेल, सवीर शाह, अशपाक सैय्यद, सतीश बारवकर, सत्यनारायण पहेरवार, ज्ञाणेश्वर पवार, सुरेश आहिरे आदींसह या हितगुज कार्यक्रमास नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व आदरणीय पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तालुका व शहर पदाधिकारी, विभागप्रमुख, तसेच मनमाड व नांदगाव शहरातील निष्ठावान शिवसैनिक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हितगुज संवाद कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन शिवसेना नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]