Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन उत्साहात संपन्न

Nov 5, 2026

मनमाड : प्रकृती स्कूलमध्ये दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कलात्मक, सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात कल्पकता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले.

या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना चित्र काढणे व रंग भरणे विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा सुंदर वापर करून आकर्षक चित्रे साकारली

इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी जलसंवर्धन, निसर्गरम्य चित्र आणि कार्पेट डिझाईन असे विविध विषय देण्यात आले. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश प्रभावीपणे मांडला. पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीची गरज आणि पर्यावरण संवर्धन याविषयी जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या विशेष आकर्षण ठरल्या. तसेच पारंपरिक व आधुनिक डिझाईन्सचा सुंदर मिलाफ साधत विद्यार्थ्यांनी आकर्षक कार्पेट डिझाईन्स साकारल्या. तसेच. इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोलेज मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.

तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध आकर्षक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेला रंग देत सुंदर आकाशकंदील, आकर्षक तोरणे, पणत्या, विविधरंगी रांगोळ्या तसेच दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांनी सजविलेल्या कलाकृती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी रंगांचा वापर करून वर्गखोल्यांची आकर्षक सजावट केली. नैसर्गिक साहित्याचा वापर करून त्यांनी पर्यावरणपूरक सजावटीचा सुंदर संदेश दिला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या सजावटीमुळे शाळेचे वातावरण दिवाळीच्या आनंदाने आणि उत्साहाने उजळून निघाले.

‘कलेतून आनंद, कल्पकतेतून सर्जनशीलता आणि कृतीतून संस्कार’ या भावनेतून आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

प्रकृती स्कूलमध्ये शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि जीवनमूल्यांची सुंदर सांगड घालण्याचा हा एक आनंददायी प्रयत्न ठरला.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]