loader image

खंडोबा महाराज उत्सव अपूर्व उत्साहात साजरा

आज दांडी पौर्णिमा मनमाड शहरात दरवर्षी या दिवशी श्री खंडोबा महाराज यात्रेचे आयोजन करून मानाच्या नवरदेवाकडून बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. गेल्या दोन वर्षांपासुन कोरोना परिस्थिती मुळे श्री खंडोबा यात्रा रद्द करण्यात आली होती , यंदाच्या वर्षी कोरोना परिस्थिती कमी झाल्याने यात्रेचे आणि बारागाड्या ओढण्याचे आयोजन करण्यात आले होते , शहरामध्ये दोन ठिकाणी बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे , शहरातील नेहेरू भवन परिसरातील पुरातन असणारे श्री खंडोबा मंदिर आणि बुधलवाडी येथील श्री खंडोबा मंदिर येथे यात्रा भरून सायंकाळी बारागाड्या ओढण्यात आल्या , यंदाच्या वर्षी गावातील खंडोबा मंदिर येथील बारागाड्या ओढण्याची मानकरी श्री काळू माळी तर बुधलवाडी येथील मानकरी श्री प्रमोद सानप आणि चि.अर्जुन बुरकूल हे होते.यंदाच्या वर्षी यात्रा भरविण्यात आल्याने मंदिर परिसरात नारळ , प्रसाद , मिठाई , खेळणी आदी दुकाने लावण्यात आल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते , दोन्हीही ठिकाणी सकाळ पासुनच शहरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होते , नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने यात्रेच्या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते.