loader image

‘कोई मिल गया’ फेम अभिनेत्याला होऊ शकते अटक

Sep 8, 2021


‘कोई मिल गया’ फेम अभिनेता रजत बेदी याच्या विरोधात डीएन नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजत बेदीवर  एका व्यक्तीला कारनं ठोकल्याचा आरोप आहे. रजतनं जखमी व्यक्तीला कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. काल सायंकाळी  अंधेरीत रजत बेदीच्या कारला अपघात झाला होता. अपघातात जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रजत बेदी याला अटक होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रजत बेदीनं अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला आश्वासन दिलं, की त्याला त्याचे पूर्ण उपचार मिळतील. मात्र, त्यानंतर रजत घरी निघून गेला. डीएन नगर पोलिसांनी सांगितलं की, रजत बेदीविरोधात आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही. मात्र, अपघातग्रस्त व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्याला रक्ताची गरज आहे.

काय म्हणाली पीडीत व्यक्तीची पत्नी?

पीडित व्यक्तीच्या पत्नीनं सांगितलं की, काल सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारात ही घटना घडली. तिचा पती कामावरून घरी परत येत होता. तो दारूच्या नशेत होता. तो रस्ता ओलांडत असताना रजत बेदीनं त्याला धडक दिली. माझा पती जमिनीवर पडला. तो गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर रजतनं त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तर रजतनं सांगितलं की, व्यक्ती अचानक त्याच्या कारसमोर आला. अपघातग्रस्त व्यक्तीला पूर्ण उपचार मिळतील, असंही रजत म्हणाला. त्यानंतर घरी निघून गेलेला रजत परत आला नाही. माझ्या पतीला काही झालं तर त्यास रजत हाच जबाबदार असेल, त्याला अटक व्हायला हवी, असं पीडितेच्या पत्नीनं म्हटलं आहे.


अजून बातम्या वाचा..

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे...

read more
प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

१३ मे २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने रचला...

read more
.