Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदेंचे दार्तृत्व ! पुरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 12, 2021

नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरूच असून आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लेंडी नदी लगत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलेंडर, शेगडी, रेगुलेटर, लायटर, ५० कीलो तांदूळ, हंडे,स्टीलची भांडी, किराणा सामान, ब्लँकेट, महिलांना २ साड्या, पुरुषांना २ ड्रेस अशी जीवनावश्यक सामुग्री उपलब्ध करून दिली.
मी सदैव जनतेसोबतच- आ. कांदे
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण प्रसंगी आमदारांच्या निवासस्थानी पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.या वेळेस आ.कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी कुटुंबीयांना धिर देत आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत, डगमगु नका अशा शब्दात धिर दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,विलास आहेर,प्रदीप कासलीवाल, किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या वारसांना मिळणार सहाय्यता निधी !

राज्याच्या इतिहासात एक वेगळे आणि शिस्तबद्ध आंदोलन म्हणून स्थान निर्माण केलेल्या मराठा आरक्षणासाठी...

read more

जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !

आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील...

read more

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली सिलेंडर स्फोटाने हताहत झालेल्या तांबोळी परिवाराची भेट : मदतीचे आश्वासन !

शुक्रवार (दि.26) रोजी खाकीबाग येथे अश्पाक तांबोळी यांच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेऊन आग लागली....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]