मनमाड शहरामध्ये गेल्या 56 वर्षांपासून नागरिकांना अध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञानाची शिदोरी देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याला शुक्रवार 26 नोव्हेंबर पासुन प्रारंभ झाला असुन यंदाच्या वर्षी हा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.
यंदाचे या सोहळ्याचे 57 वे वर्ष असुन गेली 56 वर्षंपासून सोहळा अखंड पणे मनमाड शहरात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी सोहळ्याचे आयोजन हे नेहेरु भवन येथे भव्य स्वरूपात करण्यात येत असते , परंतु गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही कोरोना परिस्थितीचा विचार करून सोहळा छत्रपती शिवाजी नगर येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे साधे पणाने साजरा करण्यात येत आहे.पहाटे 5.30 वाजता काकड आरती , सकाळी 7 ते 8 विष्णुसहस्त्रनाम , 8 ते 12 श्री ज्ञानेश्वर ग्रंथाचे परायण , सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ ,भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12.30 पर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा प्रसंगाचे अभंग वाचन होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.
या सोहळ्याचा शहरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी केले आहे.











