Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन….!

Nov 28, 2021

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 28 नोव्हेंबर पुण्यतिथी, सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाज सुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्व ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली.

येथील संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्ताने महात्मा फुले चौक येथे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकार प्रा.नितीन लालसरे आणि समितीचे जेष्ठ सदस्य रमाकांत मंत्री यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. नितिन लालसरे, संस्कृती संवर्धन समितीचे जेष्ठ सदस्य आणि मार्गदर्शक रमाकांत मंत्री, प्रमोद मुळे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण व्यवहारे सर, समिती अध्यक्ष योगेश म्हस्के, सचिव आनंद काकडे, सतिष न्हायदे, अरविंद शिंदे, संजय हादगे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]