मनमाड : येथील दत्त मंदिर रोड येथील श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाकडुन रक्तदान शिबिर संपन्न करण्यात आले.सध्या सुरू असणाऱ्या कोरोना परिस्थितीचा विचार करून अनेक सार्वजनिक गणेश मंडळे हे सरकारने केलेल्या आव्हानानुसार यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करत आहे.याचाच विचार करून श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाच्या वतीने समाजाच्या हिताचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये मनमाड शहरातील 114 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली , रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना गणेश मंडळाच्या वतीने सन्मान पत्र , झाडाचे रोप आणि कापडी पिशवी देऊन गौरविण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्धाटन हे मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंहजी आणि शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या कडुन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
करंजवन पाणीपुरवठा योजनेचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
गेल्या चार दशकांपासून रखडलेला मनमाडचा पाणीप्रश्न अखेर मिटणार असून मनमाडवरचा पाणीटंचाईचा कलंक पुसला...












