loader image
[ays_poll id=7]

ओबीसी आरक्षणाशिवाय होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका – चुरस वाढणार !

Sep 14, 2021

राज्यात आगामी निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी पाहायला मिळते. याच पार्श्‍वभूमीवर पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे लवकरच या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक माहितीनुसार, नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लवकरच याचा तारखाही जाहीर होतील अशीही माहिती आहे. इतकंच नाहीतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय झाला तर राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर असताना आता निवडणुकांमध्येही जर आरक्षणाचा फायदा होणार नसेल तर यामुळे राज्यात एकच राजकीय रंग पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

खरंतर, सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ ला दिलेल्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण हे संपुष्टात आले होते. त्यामुळे अशाच आता न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पोटनिवडणुकांचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर येत्या तीन-चार दिवसात कार्यक्रम जाहीर करण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.