आज बऱ्याच युवक-युवतींना फिटनेस व वैद्यकिय क्षेत्राचे मोठे आकर्षण आहे. मित्रांनो आरोग्यक्षेत्रात करिअर
करण्याचा एक उत्तम पर्याय शासनाने आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे तो म्हणजे योग-
नॅचरोपॅथी….!
योग-निसर्गोपचार हि एक जीवन पद्धती असुन मानवास निरोगी कसे राहावे व आजार झाल्यास तो
नैसर्गिकरित्या बरा कसा करावा हे शिकविते.आज आपण आधुनिक वैज्ञानिक युगात असुनदेखील ‘स्वास्थासुख’
हरवून बसलो आहोत. स्पर्धेमुळे चिंता व ताणतणाव वाढले असुन याचा परिणाम म्हणुन कमी वयात
लठ्ठपणा,डायबीटीज, हृदयरोग,मणक्याचे विकार तसेच फास्टफूड व खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अॅसिडीटी,
गॅसेस, बद्धकोष्ट्ता, थॉयराइड रक्तात कोलोस्टॉरचे प्रमाण वाढणे व अशा कितीतरी आरोग्य समस्या आधुनिक
जीवन पद्धतीमुळे त्रासदायक होऊ लागल्या आहेत. अशावेळी औषध-गोळ्याशिवाय वरील विविध आजार
नियंत्रणात ठेवण्यासाठी योग-निसर्गोपचारासारखे दुसरे शास्त्रच नाही. आणि म्हणुनच प्रशिक्षित योगशिक्षक व
निसर्गोपचारतज्ञांची आरोग्यक्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली आहे. निसर्गोपचारात आजार बरे करण्यासाठी
नैसर्गिक पंचमहाभूताद्वारे अर्थातच आहार, पाणी-मातीउपचार, चुंबकचिकित्सा, शास्त्रीयमसाज, अॅक्युप्रेशर
तसेच योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा याद्वारे आजार नियंत्रणात केले जातात. ह्या शास्त्राचा वैज्ञानिक
पातळीवर सखोल अभ्यास करून शासनमान्य योग-निसर्गोपचार कोर्स पुर्ण केल्यास युवक-युवतींनी ह्या क्षेत्रात
करिअर करण्याच्या अनेक संधी देखील उपलब्ध आहे.
ह्या उदिष्टानेच नाशिक येथील आशिर्वाद योग-नॅचरोपॅथी कॉलेज व उपचार केंद्रातर्फे १० वी/१२वी पास
विद्यार्थ्यांनसाठी योग-नॅचरोपॅथी क्षेत्रातील विविध शासनमान्य व विद्यापीठमान्य अभ्यासक्रम चालविले जात
आहेत. त्याअंतर्गत विद्यापीठ मान्यताप्राप्त योगशिक्षक डिप्लोमा कोर्स,त्याचप्रमाणे महाराष्ट्रराज्य व्यवसाय
शिक्षण परीक्षा मंडळाचा १ वर्ष कालावधीचा शासनमान्य योग-नॅचरोपॅथी प्रमाणपत्र अभ्यासक्रम गेल्या दहा
वर्षापासून संस्थेत यशस्वीरीत्या राबविले जात आहेत.
सदर कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नसल्यामुळे १०वी/१२वी पास विद्यार्थ्यांनप्रमाणेच गृहिणी, डॉक्टर,
शिक्षक, पॅरामेडिकल व आरोग्या विषयी आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
बाहेरगावच्या व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना योग- नॅचरोपॅथी कोर्सचा लाभ घेता यावा यासाठी संस्थेमार्फत
शनिवार व रविवार विशेष प्रॅक्टिकल बॅचेस राबविल्या जातात व निवासी सुविधा देखील पुरविण्यात येतात.
त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांना फीमध्ये शासन सवलती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
विविध आजारात योग-निसर्गोपचाराचा समाजात होत असलेला फायदा लक्षात घेता संस्थेतून पास झालेले
अनेक विद्यार्थी निसर्गोपचारतज्ञ म्हणून विविध रुग्णालये, आयुर्वेदकेंद्र, हेल्थ क्लब,पंचतारांकित हॉटेल्स
त्याचप्रमाणे योगशिक्षक म्हणून शाळांमध्ये तर काही विद्यार्थी देश परदेशात प्रॅकटीस करीत आहे.
केंद्रशासनाच्या आरोग्यविभागाच्या आयुष विभागामार्फत टेलिव्हीजनच्या माध्यमातून अनेक युवकांना या
क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन देखील केले जात आहे. म्हणूनच १० वी १२ वी पास इच्छुक विद्यर्थ्यांनी
शासनमान्य व विद्यापीठमान्य योग-नॅचरोपॅथी कोर्स करण्यासाठी आशीर्वाद योग-नॅचरोपॅथी कॉलेज, दुसरा
मजला, वसंत मार्केट, कॅनडा कॉर्नर, नाशिक मोबाईल नं .9890656146 / 9890656147 येथे संपर्क साधावा
असे आवाहन अध्यक्ष डॉ. नितीन शिंपी व प्राचार्य सौ. मिनल शिंपी यांनी केले आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नाशिकचे भूमीपूत्र श्री योगेश्वर कांडाळकर यांची प्रमुख उपस्थिती....












