loader image
[ays_poll id=7]

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ!

Sep 17, 2021

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून विविध कृषी योजना एकाच छताखाली
आणून लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी
आपल्या नावाची नोंदणी केल्यास या विशेष सेवेअंतर्गत एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा
लाभ घेता येणार असून, शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज https://mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची निवड होवून देखील
कागदपत्रे अपलोड केले नाहीत, अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ आपले कागदपत्रे
महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज रद्द करण्यात
येईल, अशा सुचनाही नाशिक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी शासकीय प्रसिध्दी
पत्रकान्वये दिल्या आहेत.
संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करतांना काही तांत्रिक अडचणी आसल्यास
किंवा अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा दूरध्वनी क्रमांक
020-25511479 व helpdeskdbtfarmer@gmail.com इमेलवर संपर्क साधवा,
असेही नाशिक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
.