आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान यांना नियुक्ती पत्र दिले.
शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व युवा खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे राज्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांनी अल्ताफ खान यांची सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली.
आ.सुहास कांदे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अल्ताफ खान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असलेल्या जुन्या – जाणत्या शिवसैनिकांमध्ये अल्ताफबाबा यांचा समावेश आहे. त्यांच्यावर यापूर्वी पक्षाने ग्रामीण जिल्हाप्रमुख, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख आदी जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या आहेत.
शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करण्यास मी बांधील असल्याचे अल्ताफबाबा खान यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले माजी नगरसेवक पिंटू शिरसाठ, दऊ तेजवानी, आझाद पठाण, लाला नागरे, दादा घुगे, पिंटू वाघ, स्वराज वाघ, सागर आव्हाड, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, आसिफ पठाण आदी उपस्थित होते.