loader image

ऐश्वर्या रायची संपत्ती – अबब ऐकून व्हाल चकित !

Sep 17, 2021


बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्‍चन हिची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. कारण ऐश्वर्या ही देशातीलच नाही तर जगभरातील हाय प्रोफाइल सेलिब्रिटीज बनली आहे. सन 1994 मध्ये मिस वर्ल्डचा खिताब पटकावल्यानंतर ऐश्वर्या कायम चर्चेत आहे. ऐश्वर्याला भारत सरकारने देखील ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. इतकंच नाही तर सन 2012 मध्ये फ्रान्स सरकारने ऐश्वर्याला ‘ऑर्ड्रे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस’नं पुरस्कृत केलं होतं.

ऐश्वर्यानं 47 वर्षाच्या वयात स्वत:ला मेंटेन ठेवलं आहे. जगातल्या सुंदर महिलांमध्ये तिची गणना केली जाते. ऐश्वर्याची संपत्ती किती? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देत आहोत.

बॉलिवूडचा बादशाह अर्थात अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्याची संपत्ती ऐकून तुमचं डोकं गरगरेल.  ऐश्वर्या आज कोट्यावधींची मालकीन आहे. एका कंपनीच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय-बच्चनकडे जवळपास 227 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सन 2021 मध्ये तिची नेट वर्थ 31 मिलियन डॉलर आहे.

ऐश्वर्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. त्यात Mercedes-Benz S500, Audi A8 L, Lexus LX 570 and Mercedes-Benz GLS सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी 5-6 कोटी रुपये मानधन घेते. ऐश्‍वर्याने सन 1997 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.


अजून बातम्या वाचा..

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे...

read more
प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

१३ मे २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने रचला...

read more
.