loader image

कोरोना संसर्ग – रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

Sep 17, 2021


शरीर निरोगी ठेवण्यासाठी, योग्य प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या कोरोना संसर्गकाळात तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत, आपल्यापैकी बरेचजण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती देखील अवलंबतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. पण, आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण इथं आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपायांचा अवलंब करून तुमची प्रतिकारशक्ती कशी मजबूत करायची ते सांगणार आहोत. आपण आपली प्रतिकारशक्ती कशी मजबूत करू शकतो जाणून घ्या.

चांगली झोप प्रतिकार शक्ती मजबूत करते
तुम्हाला माहित आहे का की चांगल्या पोषणाबरोबरच चांगली झोप ही रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची आहे. यासाठी तुम्ही रात्री 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपताना खोलीत अंधार ठेवा. महत्वाचं म्हणजे झोपण्यासाठी आणि सकाळी उठण्यासाठी समान वेळ ठेवा.

कमी ताण घ्या
तुम्हाला माहित आहे का की ताण घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे रोग तुमच्या शरीराला घेरू शकतात. कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्ट्रेस हार्मोनमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणून स्वतःला तणावापासून दूर ठेवा किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरुन टेंशन घेणे थांबवा.

नियमित व्यायाम करा
हे सर्वांना माहित आहे की व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. व्यायामामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यासोबतच शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देखील मिळते. एवढेच नाही तर जर तुम्ही रोज व्यायाम केलात तर तुम्हाला सर्दी-खोकला कमी होते.

योग्य आहार

रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य आहार घेणेही फार महत्वाचे आहे. यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, मासांहार योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. चुकीचा आहार देखील तुमची प्रतिकारशक्ती कमी करू शकतो.


अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस उपलब्ध 4 थेंबही पुरेसे : पहिला आणि बूस्टर डोस म्हणून...

read more
स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

श्री आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड, श्री के....

read more
स्वर्गीय उद्योगपती संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी  निःशुल्क हृदयरोग शिबीर

स्वर्गीय उद्योगपती संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी निःशुल्क हृदयरोग शिबीर

मनमाड :- श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर व श्री जैन सुशील अमृत महिला मंडळ...

read more
.