loader image
[ays_poll id=7]

पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता? – जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ !

Sep 19, 2021


भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हणून संबोधून मुख्यमंत्र्यांनी आधीच राजकीय भूकंप सदृश्य परिस्तिथी निर्माण केली असताना आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे लवकरच शिवसेनेत येण्याची शक्यता असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 

गेल्या काही दिवसाच्या हालचाली पाहता काही मंडळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा चिमटा देखील पाटील यांनी काढला.

आमचे महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, विरोधकानी त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आमच्यात काहीही मतभेद नाहीत. हे सरकार स्थिर आहे. दोन वर्ष भाजपचे नेते असंच बोलत आहेत. त्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. विशेष म्हणजे दोघेही नेते एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. 


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.