नाशिकच्या सिडको परिसरात सराफ व्यावसायिकाकडे चोरीची घटना ताजी असताना काळ पुन्हा सिडकोतील सद्गुरू अलंकार या सराफी दुकानातून चोरट्यांनी 7 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र वाढत्या चोरीच्या घटनेमुळे सिडको परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सिडको परिसरात सराफी पेढीतील चोरीची घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याने नाशिकमधील कायदा सुवव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सिडको परिसरात काल दुपारी धाडसी चोरी झाली. भर दिवसा चोरट्यांनी 15 तोळे सोने व रोख रक्कम असा 7 लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला.
सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली.













