loader image
[ays_poll id=7]

नाशिकच्या कोमलची सुवर्ण कामगिरी – २०२२ च्या आशियाई स्पर्धेसाठी निवड !

Sep 30, 2021

नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरच्या कोमल जगदाळे हिने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून २०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. महिलांच्या तीन हजार स्टिपलेस प्रकारात ती अजिंक्य ठरली. 

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सध्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा सुरू आहेत. नाशिकची कोमल जगदाळे ही लांब पल्ल्यांची धावपटू आहे. या स्पर्धेत तिने तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात हे अंतर 9 मिनिटे आणि 51.56 सेकंदात पार केले. या यशाबद्दल कोमलचे कौतुक होत आहे. तिचे हे या स्पर्धेतले दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने याच स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. हे अंतर तिने कोमलने 16:03:53 इतक्या वेळेत कापले. स्पर्धेत हरियाणाच्या सोनिकाने 17:00:46 वेळेत अंतर कापत रौप्य पदक मिळवले. तर एस. बाधो हिने 17:40:41 वेळेत अंतर कापत कांस्य पदक पटकावले. मात्र, या दोघीही कोमलच्या खूप मागे राहिल्या होत्या. या स्पर्धेत यश मिळवल्याने कोमल जगदाळे 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अजून बातम्या वाचा..

अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु...

read more
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या...

read more
युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

दुर्र्स अल्बेनिया येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (दि- 23 मार्च ते 2 एप्रिल 2023)...

read more
कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय...

read more
पाच वर्षाच्या कमबॅक नंतर अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश.. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सीनियर नॅशनल रोईंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई..

पाच वर्षाच्या कमबॅक नंतर अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश.. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सीनियर नॅशनल रोईंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई..

नाशिकचे अर्जुन वीर तसेच आशियाई सुवर्ण पदक विजेते ओलंपियन दत्तू बबन भोकनळ यांनी दिनांक 20...

read more
इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नाती व नांदगाव चे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या...

read more
.