loader image

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा सुवर्ण वेध

Mar 25, 2023


मनमाड : बेंगलोर येथे सूरु असलेल्या ४ थ्या महिला मानांकन राष्ट्रिय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड ची १२वी वाणिज्य शाखेची कु. वीणाताई संतोष आहेर हिने क्लिन जर्क मध्ये नवीन राष्ट्रिय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक पटकावले. ५७ किलो स्नॅच व ७४ किलो क्लिन जर्क असे १३१ किलो वजन उचलून विनाताई आहेर हिने सुवर्णपदक व रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवित आपल्या सलग तिसऱ्या राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक व राष्ट्रिय विक्रम करीत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या यशाबद्दल या खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उप-प्राचार्य डॉ. शेंडगे , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,कुलसचिव श्री.समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.सुहास वराडे, प्रा.महेंद्र वानखेडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.