loader image
[ays_poll id=7]

मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप!

Oct 1, 2021

आपल्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारणार आहेत. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्या, पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदवुत्तर अभ्यासक्रमाची फी माफी आदी मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या होत्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सेंट्रल मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने निवासी डॉक्टरांनी पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.

निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला या मागण्यांविषयीचे स्मरणपत्र सादर केले होते. आपल्या मागण्यांविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती या स्मरणपत्रातून मार्डने राज्य शासनाला केली होती. तसेच याबाबत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत तात्काळ निर्णय न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय मागण्या लेखी स्वरुपात मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे. कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेली सेवा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप फी माफीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचे स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.