मनमाड – बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30 वाजता श्री स्थापना पालखी महामिरवणूक भाद्रपद गणेश उत्सव काळात दररोज सकाळी ठीक 6-00 वाजता श्री निलमणी महागणेशास महा अभिषेक पूजा व दररोज रात्री ठीक 8-00 वाजता श्री नीलमणी महागणेशची महाआरती गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 09 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम
मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरात सन 1997 पासून सलग 29 व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे बुधवार दिनांक 27/08/2025 ते शनिवार दिनांक 06/09/2025 या कालावधीत सलग 11 दिवस भाद्रपद महागणेश उत्सव चे मोठ्या उत्साहात करण्यात येण मनमाड शहराच्या धार्मिक सामाजिक,सांस्कृतिक ,सेवाकार्य परंपरेमध्ये तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये मानाचे स्थान असणार्या आणि‼आम्ही परंपरा पाळतो……! आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…..!‼ हे ब्रीदवाक्य घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या उत्सव परंपरेला साजेसा असणारा उत्सव श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे गत 28 वर्षा पासून साजरा केला जातो. यंदा हे भाद्रपद गणेशोत्सव चे 29 वें वर्ष आहे या मनमाड शहरातील मानाच्या महागणेश उत्सवात सर्व श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे नम्र आवाहन श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये होणारी श्री निलमणी ची महाआरती भक्तांना दररोज रात्री ठीक 8 -00 वाजता श्री निलमणी गणेश मंदिर मनमाड या फेसबुक पेज वरुन लाइव पहाता येणार आहे या महाआरती चा नित्य लाभ घेणे साठी सर्व गणेश भक्तां नी वरील फेसबुक पेज त्वरित लाइक करावे आणि इतर भक्तांनाही सांगावे सामाजिक बांधिलकी जपत सन 2017 पासून श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णाच्या सेवे साठी सुरू करण्यात आलेला शिल्लक औषध केंद्र उपक्रम यंदाही सलग 09 वे वर्षी सुरु राहणार आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपले कडे असणाऱ्या शिल्लक औषधे की ज्यांची एक्सपायरी शिल्लक आहे अश्या औषधे देणे साठी 8668954060 या मोबाइल नंबर वर संपर्क करावा ही औषधे ट्रस्ट चे स्वयंसेवक आपले कडून संकलित करतील मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेशभक्त नागरिक, बंधु भगिनींनी यंदाचा भाद्रपद गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा तसेच ट्रस्ट,शासन, पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे असे नम्र विनंती/ आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे.