loader image
[ays_poll id=7]

दि.०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून श्री साईबाबा मंदिर भक्तांसाठी सज्ज…

Oct 5, 2021

राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्‍यक्‍ती तसेच मास्‍क न वापरणा-या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घट स्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत.
दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ रोजीच्‍या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून सकाळी ०६.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत मंदिर खुले राहणार असून दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाईल. यापैकी १० हजार ऑनलाईन पास (०५ हजार सशुल्‍क व ०५ हजार निशुल्‍क), व ०५ हजार निशुल्‍क व सशुल्‍क ऑफलाईन पासेस असतील. प्रत्‍येक तासाला ११५० साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासची बुकींग करावी लागेल. तसेच जे साईभक्‍त शिर्डी येथे येतील अशा साईभक्‍तांना ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करावी लागेल. या ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करीता संस्‍थानच्‍या सर्व निवासस्‍थान येथे काऊंटरची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहेत. सकाळी ०५.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत संस्‍थानचे साईआश्रम ०१, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, श्रीराम पार्कींग, साई कॉम्‍प्‍लेक्‍स व शिर्डी बसस्‍थानक येथील दर्शन पास काऊंटर वरुन दिले जातील. तसेच प्रत्‍येक आरतीकरीता एकुण ८० साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल. त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणा-या शिर्डी ग्रामस्‍थांना १० पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना १० आरती पासेस हे साईउद्यान निवासस्‍थान येथुन तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जाणार असून ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऑनलाईनव्‍दारे २० आरती पासेस, महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता ५० आरती पासेस दिले जातील. सशुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर ०१ शेजारील दर्शनरांगेतील पास वितरण काऊंटरवरुन दिले जातील. सर्व साईभक्‍तांनी दर्शनाकरीता जाताना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे (०६ फुट अंतर ठेवुन आखणी करणेत आलेले मार्कींग प्रमाणे) पालन करावे. मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व्‍यक्‍ती व आजारी व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पुजा, अभिषेक पुजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.
दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर ०२ मधुन प्रवेश दिला जाणार असून व्‍दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ०४ व ०५ नंबर गेटव्‍दारे बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या साईभक्‍तांना ताप असेल अशा साईभक्‍तांना तात्‍काळ उपचाराकामी कोवीड केअर हॉस्पिटलमध्‍ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्‍यात येईल. तसेच मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान करणे, थुंकणेस बंदी आहे. त्‍याचे उल्‍लंघन करणा-यावर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे श्रीमती बानायत यांनी सांगितले.
ज्‍या साईभक्‍तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. दर्शन पासेस वरील नमुद वेळे प्रमाणेच (स्‍लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमुद वेळेचे १५ मिनीटे अगोदर प्रवेशव्‍दारावर उपस्थित रहावे. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
.