loader image
[ays_poll id=7]

काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीच्या ताकदीची गरज – नाना पटोले

Oct 5, 2021

‘काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी एनएसयुआयच्या (National Students Union Of India) युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, तरुण हे देशाचे भविष्य आहेत. आपला देश हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश असून देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची उद्याची ताकद आहात. सामान्य माणसातून नेतृत्व उदयाला आले पाहिजे, यासाठी एनएसयुआयनेही तालुका पातळीपर्यंत जाऊन विस्तार केला पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे, एनएसयुआयच्याही बुथ कमिट्या बनवल्या पाहिजेत. तुमच्यातून पक्षाचे नेतृत्व पुढे आले पाहिजे त्यासाठी ताकदीने कामाला लागा. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण, शासकीय-निमशासकीय कंत्राटी नोकरभरती होणार खासगी कंपन्यांमार्फत

राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण, शासकीय-निमशासकीय कंत्राटी नोकरभरती होणार खासगी कंपन्यांमार्फत

निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारशी...

read more
कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

गोंदियामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अनुदानाचे पैसे मंजूर करण्यासाठी दोन हजार...

read more
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच...

read more
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक...

read more
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता सरकारी कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विधिमंडळात या...

read more
नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे राज्याच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा...

read more
.