loader image
[ays_poll id=7]

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

Mar 12, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे राज्याच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी 212 कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहे.अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते व पूल यावर लक्ष केंद्रित करत पाठपुरावा केला असता 212 कोटींची कामे मंजूर करून घेण्यात आमदार कांदे यांनी यश मिळवले. नांदगाव मतदार संघातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते तसेच अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते पावसाळ्याच्या कालावधीत नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला त्या अनुषंगाने नांदगाव मतदार संघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा व पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला त्यापैकी नांदगाव तालुक्यात 79 कोटी दहा लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी 32 कोटी 65 लक्ष तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी 45 कोटी 45 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी 124 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्त्यांच्या व पुलांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
.