loader image
[ays_poll id=7]

कोरोना संसर्गाचे नियम पाळत सरसकट शाळा उघडा व विनाअनुदानित शाळांना विनाअट सरसकट अनुदान द्या : अध्यापकभारती

Oct 5, 2021


येवला :
मानवी जीवनात शिक्षण-शाळांचे महत्व कधी नव्हे इतके जगाला कळाले आहे.महाराष्ट्र तथा देशातील शाळा महाविद्यालय मार्च २०२० पासून आजवर शाळा बंद राहिल्या आहेत. ऑनलाईन शाळा अभ्यासाचा पुरता बोजवारा उडाला होता अशा वेळी दिनांक ४ सप्टेंबर २०२१ पासून शहरातील इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी इयत्तेचे वर्ग प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरूपात उघडण्याची आनंदवार्ता असली तरी आता शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी (प्ले ग्रुप वगळता) प्राथमिक शाळा पासून सर्व शाळा महाविद्यालय सरसकट उघडव्यात व आयुष्याची वीस वर्षेहून अधिक काळ विणावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शाळा-वर्ग तुकड्यावर कार्यरत शिक्षकांना विनाअट सरसकट १००% अनुदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीच्या वतीने सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदनावर सुभाष वाघेरे,शैलेंद्र वाघ,महेंद्र गायकवाड,अमीन शेख,मिलिंद गुंजाळ,संतोष बुरंगे, प्रा.मिलिंद गांगुर्डे,वनिता सरोदे-पगारे,भारती बागुल,अतुल डांगळे,दीपक शिंदे,कुलदिप दिवेकर,सागर पगारे,प्रा.के.एस.केवट,प्रा.नितीन केवट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
.