loader image

रामायणमधील “रावण” अरविंद त्रिवेदी यांचे निधन !

Oct 6, 2021


टीव्ही जगतातील रामायणया लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारली होती.  

बुधवारी सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र, मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे

रामायणमध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाया अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका विक्रम आणि वेताळमध्येही काम केले होते. ही मालिकाही बरीच गाजली होती

रविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला होता. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमांतुन अरविंद त्रिवेदी यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

.