Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद बोथरा यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप !

Oct 6, 2021

मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा ह्यांचा वाढदिवस वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जवळपास १५० विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सर्वप्रथम मुख्याध्यापक वाघ सर यांची शाळेतर्फे आनंद बोथरा यांचे स्वागत केले, त्यानंतर शाळेतील स्टाफ तर्फे त्यांचा बुके, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

 

सदर प्रसंगी रोहिदास सोनवणे, संजय सोनवणे, कुणाल गोंधळे, प्रवीण गागरे, मुख्याध्यापक संजय वाघ सर, अरुण भामरे सर, भाऊसाहेब अहिरे सर, अनिल बोरसे सर, सुनंदा बच्छाव, पूजा गुंडगळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन वंजारवाडी येथील संजय सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय वाघ सर यांनी केले. वाढदिवस साजरा केल्याबद्दल आनंद बोथरा यांनी सर्वांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]